आज सकाळ मस्त झाली. आयत्या वेळी गाडीने असहकार पुकारल्याने पी. एम. टी. ने मंडईत गेलो. सकाळी 7 वाजता अजून दुकाने उघडत होती. अत्तार गल्ली- जिथे सगळं देवपूजेचं सामान मिळतं तिथला एक दुकानदार त्याची सकाळची कामे रेडिओ ऐकता ऐकता तल्लीन होऊन करत होता. बडी देर भई नंदलाला लागलं होतं. इतक्या भसाड्या आवाजात हा दुकानदारही ते गाणं म्हणत होता आणि रफीसाहेबांना क्या बात है... क्या गाया है.. वाह.. करून दादही देत होता की ते पाहूनच खूप छान वाटलं आम्हाला. असं निःसंकोचपणे आपल्या आहे त्या आवाजात हल्ली किती वेळा गातो आपण? फार आवडलं. नंतर परत बसमध्ये बसलो तर पहिली दुसरीच ट्रिप असल्याने ड्रायव्हर आणि कंडक्टर पण फुल टू जोशमध्ये. आम्ही दोन चारच माणसं होतो. त्यांची तिकिटे दिल्यावर कंडकटर साहेबांनी मोबाईल वर लता बाईंची सुंदर गाणी लावली. आणि ड्रायव्हरला सगळी गाणी तोंडपाठ. एक कडवं झालं की तो फर्माईश करायचा- ए आता अनाडी मधलं लाव गाणं, लगेच ते गाणं लता आणि ड्रायव्हर साहेब म्हणणार. मग एक कडवं झालं की प्रेमरोग मधलं , मग अजून दुसरं, मग लगेच किशोरकुमार आणि बॉम्बे टू गोवा.. अरे मज्जाच होती आज आमची. इतकं मस्त वाटलं की बास. सका...
Posts
- Get link
- X
- Other Apps
कसलं बेफाट addiction आहे....😄😄😄 ... झालं असं की आमच्या भांडीवाल्या मावशी सतत फेसबुक आणि व्हॉटस अॅप अप वरच असतात. इतक्या की मी पार वैतागून म्हणते त्यांना कधीकधी की अहो, तो फोन बाजूला ठेवलात तर होईल काम. मग म्हणतात की नाही हो ताई, मला काय फोनच वेड नाही बघा.. मी सर्द .😏😏 तर एकदाचा पहिला फोन बंद पडला परवा त्यांचा. अतिवापरा ने मान टाकली बिचार्याने. मग काय , जगबुडीच की हो आली. मावशींना जगण्यातच राम वाटेना. मोबल्या नाही हातात मग हाताचं करू तरी काय असं झालं अगदी. मग मन लागेना, चिडचिड वाढली, मुलांना धोपटून झालं. एक दिवस त्यांनी दुःखात नवर्याला डबा नाही दिला, कामांना दांड्या मारल्या, अगदी गम में चूर. 😢😢 शेवटी त्यांच्या नवर्याने काल चांगला 10000 चा नवा कोरा मोबाईल आणला. सिम वगैरे घातलं आणि काय............... फेसबुक, व्हॉट्सअप दिसेना. मध्यरात्र झाली त्याच्याशी खेळता खेळता. डोळ्यांना मुसळधार लागली... कसं बाई नवर्याला काही येत नाही म्हणून रात्री भांडून झालं. 😠 मग आज 3 तास पूर्वी दोघांची पालखी आली आमच्याकडे. त्यांचा नवरा तर पार बिचारा होऊन गेला होता. त्याल...
- Get link
- X
- Other Apps
सगळं छोटं पब्लिक एकसारखंच गोंडस असतं नाही...आमच्या इथे कुत्री, मांजरं, पक्षी यांच्यासाठी एका भांड्यात पाणी भरून ठेवतो आम्ही. आसपास दोन चार अगदीच छोटी कु्त्र्याची पिल्लं आहेत. आज त्यातलं एक पिल्लू मस्त स्टाईल मध्ये आलं, बघू तरी काय आहे भांड्यात अशा थाटात. मग पाणी प्यावं असा एकदाचा भांड्या भोवती 4 फेऱ्या झाल्यावर विचार पक्का झाला त्याचा. आता आपण केवढे, पाणी किती, कसं प्यावं याचा विचार करण्याइतकं मोठं नाहीच ते. पटकन अख्खं तोंड त्या भांड्यात घातलं त्याने. पार डोळे, कपाळ भिजेतो. एक सेकंदाचा कारभार.असलं घाबरून बाहेर डोकं काढलं त्यानं आणि विचारात पडलं, नेमकं झालं काय मला..आणि मग परत 2 मिनिटे थांबून काळजीपूर्वक फक्त जिभेने पाणी नीट पिता येईल असं उभं राहिलं. मी त्या भिजलेल्या ध्यानाला बघून इतकी हसले, ते मात्र त्या बच्चा ला नीट कळलं.पाणी पिऊन आपण किती हुशार असा चेहरा करून गेलं तुरुतुरु...........😂😂😂
- Get link
- X
- Other Apps
आपलं डिफॉल्ट सेटिंग .. आत्ता आमच्या दरवाज्यावरून एका शाळेची नक्षत्रदिंडी चालली होती . 27 छोटे छोटे ग्रुप होते मुलींचे . हातात नक्षत्रांचे नाव लिहिलेल्या पाट्या . रेवती , स्वाती , विशाखा अशा . मुली फक्त 5 वर्षांच्या जास्तीतजास्त . सुरेख ड्रेस पण दिले होते त्यांना . प्रत्येक ग्रुपमागे त्यांचे शिक्षक . दोन दोनच्या जोड्या करून रस्त्यातून निघाली होती ही दिंडी . या छोटुकल्यांना त्यांच्या शिशु शाळेच्या घोषणा शिकवल्या होत्या . आता काही मुली अगदी छान म्हणत होत्या . आमच्या दरवाज्या समोर हे लोक आले तेव्हा एका शिक्षिकेने घोषणेला सुरुवात केली , एक दोन तीन चार .... आता यापुढे त्या शाळेचा जयजयकार असं होतं . या सगळ्या छोट्या मैत्रिणी एकसाथ "गणपती चा जयजयकार" म्हणाल्या . आम्ही रस्त्यावर चे सगळे हसतोय. शिक्षिका अग मुलींनो असं काय म्हणून कसंबसं हसू दाबत घोषणा देतायत आणि हा निरागस मोर्चा काय चुकलं आपलं असा चेहरा करून पाहतायत . असलं गोड होत सगळं . तेव्हा वाटलं , काही काही घोषणा या डिफॉल्ट सेटिंग सारख्या आपल्या डोक्यात फिट असतात नाही ....