कसलं बेफाट addiction आहे....😄😄😄
... झालं असं की आमच्या भांडीवाल्या मावशी सतत फेसबुक आणि व्हॉटस अॅप अप वरच असतात. इतक्या की मी पार वैतागून म्हणते त्यांना कधीकधी की अहो, तो फोन बाजूला ठेवलात तर होईल काम. मग म्हणतात की नाही हो ताई, मला काय फोनच वेड नाही बघा.. मी सर्द .😏😏
तर एकदाचा पहिला फोन बंद पडला परवा त्यांचा. अतिवापरा ने मान टाकली बिचार्याने. मग काय , जगबुडीच की हो आली. मावशींना जगण्यातच राम वाटेना. मोबल्या नाही हातात मग हाताचं करू तरी काय असं झालं अगदी. मग मन लागेना, चिडचिड वाढली, मुलांना धोपटून झालं. एक दिवस त्यांनी दुःखात नवर्याला डबा नाही दिला, कामांना दांड्या मारल्या, अगदी गम में चूर. 😢😢
शेवटी त्यांच्या नवर्याने काल चांगला 10000 चा नवा कोरा मोबाईल आणला. सिम वगैरे घातलं आणि काय............... फेसबुक, व्हॉट्सअप दिसेना. मध्यरात्र झाली त्याच्याशी खेळता खेळता. डोळ्यांना मुसळधार लागली... कसं बाई नवर्याला काही येत नाही म्हणून रात्री भांडून झालं. 😠
मग आज 3 तास पूर्वी दोघांची पालखी आली आमच्याकडे. त्यांचा नवरा तर पार बिचारा होऊन गेला होता. त्याला बिचार्या ला पासवर्ड, डाउनलोड असलं काही माहीत नाही आणि मावशींचा आवेश पहाण्यासारखा. एकदाचं सगळं नाटक मगाशी संपल.
मी फेसबुक आणि व्हॉट्सऍप त्यांना दाखवलं मात्र... किती सांगू मी सांगू कुणाला झालं त्यांना आणि ओंजळीत मोबाईल पकडून तीन वेळा नमस्कार पण झाला करून. आम्ही दोघे इतके हसतोय मगाचपासून पण हॉरीबल आहे हे... खूप म्हणजे खूप. 😨
.
Comments
Post a Comment