आपलं डिफॉल्ट सेटिंग..
आत्ता आमच्या दरवाज्यावरून एका शाळेची नक्षत्रदिंडी चालली होती.27 छोटे छोटे ग्रुप होते मुलींचे. हातात नक्षत्रांचे नाव लिहिलेल्या पाट्या.रेवती, स्वाती, विशाखा अशा. मुली फक्त 5 वर्षांच्या जास्तीतजास्त. सुरेख ड्रेस पण दिले होते त्यांना. प्रत्येक ग्रुपमागे त्यांचे शिक्षक. दोन दोनच्या जोड्या करून रस्त्यातून निघाली होती ही दिंडी. या छोटुकल्यांना त्यांच्या शिशु शाळेच्या घोषणा शिकवल्या होत्या. आता काही मुली अगदी छान म्हणत होत्या.
आमच्या दरवाज्या समोर हे लोक आले तेव्हा एका शिक्षिकेने घोषणेला सुरुवात केली, एक दोन तीन चार....आता यापुढे त्या शाळेचा जयजयकार असं होतं.या सगळ्या छोट्या मैत्रिणी एकसाथ "गणपती चा जयजयकार" म्हणाल्या.आम्ही रस्त्यावर चे सगळे हसतोय. शिक्षिका अग मुलींनो असं काय म्हणून कसंबसं हसू दाबत घोषणा देतायत आणि हा निरागस मोर्चा काय चुकलं आपलं असा चेहरा करून पाहतायत. असलं गोड होत सगळं.
तेव्हा वाटलं, काही काही घोषणा या डिफॉल्ट सेटिंग सारख्या आपल्या डोक्यात फिट असतात नाही...
Comments
Post a Comment